साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या : बॉम्ब स्फ़ोट प्रकरणी वॉरंट
भाजप खासदार आणि कट्टर हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने वॉरंट जारी करण्यात आले आहे. ज्यामुळे आता साध्वींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
परंतु, महत्त्वाची बाब म्हणजे, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांचे तिकीट कापत त्यांच्या जागी आलोक शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे याच कारणास्तव भाजप पक्षश्रेष्ठींनी साध्वी प्रज्ञा सिंहचे तिकीट तर नाही कापले ना? अशा चर्चांना उधाण आले आहे.
मुंबईतील राष्ट्रीय तपासयंत्रणेच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. साध्वी प्रज्ञा या मालेगावर बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीला न्यायालयात गैरहजर होत्या. त्यामुळे एनआयए न्यायालयाने साध्वी प्रज्ञा यांना वॉरंट बजावले आहे.10 हजार रुपयांच्या या जामीनपात्र वॉरंटची येत्या. 20 मार्चपर्यंत अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. साध्वी प्रज्ञा या अंतिम जबाब नोंदणी प्रक्रियेला गैरहजर राहत आहेत. त्यामुळे या खटल्याचा निकाल लागण्यास विलंब होत असल्याची तक्रार इतर आरोपींनी केली आहे. त्याची दखल घेत विशेष न्यायालायने साध्वी प्रज्ञा यांच्याविरोधात वॉरंट जारी केले असल्याची माहिती समोर आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.