जमिनीच्या तुकड्यासाठी सख्ख्या भावाला दगडाने ठेचून संपवलं
छत्रपती संभाजीनगर : आई-वडिलांनंतर रक्ताचं आणि अतिशय खास मानलं जाणारं नातं म्हणजे भावंडांचं. आपली मुलं प्रत्येक परिस्थिती एकमेकांच्या सोबत राहतील, एकमेकांना साथ देतील, असं पालकांना वाटत असतं. मात्र, मुलं मोठी होताच आपल्या मार्गाने पुढे जातात. कधीकधी भावांमधील नातं नेहमीच खास राहातं आणि ते एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. मात्र, कधीकधी अगदी छोट्या गोष्टींमुळे यात कटुता येते. याचा परिणाम अनेकदा फार भयानक होतो. याचाच प्रत्यय देणारी एक घटना आता छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे.
भावंडांमध्ये झालेल्या भांडणाच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. मात्र, भांडणात जर भावानेच भावाचा जीव घेतला तर? अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. शेती आणि सामाईक घर तसंच जुन्या वादातून सख्खा भाऊ आणि पुतण्याने एका व्यक्तीला मारहाण केली. विटा, दगडाने केलेल्या या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सिल्लोड तालुक्यातील भराडी जवळील पिरोळा येथे घडली आहे.
याप्रकरणी मृताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करून न्यायालयासमोर उभं केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जम्मन त्रिंबक गोरे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर, भाऊ रघुनाथ त्रिंबक गोरे आणि पुतण्या कृष्णा रघुनाथ गोरे अशी आरोपींची नावं आहेत. ते सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.