Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'देवेंद्र फडणवीस यांचा येण्या-जाण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी स्वतः करतो, पण त्यांनी!

'देवेंद्र फडणवीस यांचा येण्या-जाण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी स्वतः करतो, पण त्यांनी!


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पत्रकरांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस यांना मणिपूर आणि लडाखला जाऊन तेथील स्थानिक लोकांशी भेटावे असा सल्ला दिला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचा जाण्या-येण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी करतो, त्यांनी मणिपूरला जावं, त्यांनी लडाखला जावं, पण त्यांनी तिथे जाऊन परिस्थिती पाहावी. तसेच त्यांनी एखादा बॉलिवूड निर्माता शोधून मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा, असं ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नवोदित आणि पर्यावरण कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांनी त्यांचे 21 दिवसांचे उपोषण सोडले, परंतु लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह तिच्या इतर मागण्या थंड झालेल्या नाहीत. शुक्रवारी, वांगचुकच्या उठावाच्या दुसऱ्या दिवशी, लेहमधील त्याच एनडीएस मेमोरियल पार्कमध्ये उणे ८ अंश सेल्सिअस थंडीत ७० महिला उपोषणाला बसल्या. तसेच मणिपूरमध्ये मागील सात ते आठ महिन्यापासून हिंसाचार सुरु आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे 'देवेंद्र फडणवीस यांचा येण्या-जाण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी स्वतः करतो, पण त्यांनी मणिपूर आणि लडाखला जाऊन यावं, त्यांच्या सर्व खर्च मी करतो, त्यांच्या हॉटेलचा खर्छ करतो, पण त्यांनी मणिपूर आणि लडाखला जाऊन तेथील परिस्थिती पाहावी. अरुणाचल प्रदेश आणि दार्जिलिंगला जावं. निर्वासित काश्मिरी पंडितांना भेटावे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. बॉयकॉट बॉलीवूड म्हणणारे बॉलीवूडच्या नादी लागलेत, त्यामुळे एखाद प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा, असं म्हणत त्यांनी यावेळी निशाणाही साधला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.