मराठी दर्शनी फकल लावणे बंधनकारक आज ५ आस्थापना दंड भरण्यासाठी दिले चलन
आज ५ आस्थापना दंड भरण्यासाठी चलन दिले आहे, ते भरले नाही तर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार उप आयुक्त वैभव साबळे
पंचमुखी मारुती रोड एसटी स्टँड परिसर हरभट रोड सांगली पोलीस स्टेशन कापड पेठ येथे सर्व दुकानदारकांनी इंग्रजी मध्ये फलक लावले असल्याने मराठी मध्ये दर्शनी फलक लावणे बंधनकारक आहे.
उप आयुक्त वैभव साबळे ,सहा आयुक्त सहदेव कावडे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बारगिर आणि स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे ,अतिक्रमण कर्मचारी यांनी वरील कार्यवाही केली आहे.
1) गोल्डन जिम स्पोर्ट्स अँड सप्लीमेंट2)ADI कॉम्प्युटर्स3) हॅप्पी मेडिकल4) केंब्रिज क्लॉथ सेंटर5) हॉटेल शिवनेरीया आस्थापना असून यांना दंड भरण्यासाठी चलन दिले आहे ,त्यांनी ते भरणे आवश्यक असून ते भरले नाही तर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.शहरातील सर्व आस्थापना यांनी मराठी मध्ये फलक लावणे कायदाने बंधनकारक आहे, त्या मुळे शासनाच्या आदेशाची अमलबजावणी सत्वर करणे बाबत महापालिका वतीने वारंवार सूचना दिल्या आहेत, या पुढे अमलबजावणी करणार नाही त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे,जन संपर्क अधिकारीसदरची बातमी प्रसिध्द करावी ही विनंती
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.