Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून अमेरिकेचा डोस

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून अमेरिकेचा डोस 

आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या ऐन तोंडावर करण्यात आलेली अटक जगातील प्रमुख राष्ट्रांनाही रुचलेली नाही. जर्मनीपाठोपाठ आज अमेरिकेनेही, केजरीवाल यांच्यावरील कायदेशीर कारवाई उचित आणि पारदर्शी पद्धतीने व्हायला हवी. आमचे लक्ष आहे, असा डोस मोदी सरकारला दिला.

जर्मनीच्या परराष्ट्र कार्यालयानेही नुकतेच, आरोपांचा सामना करणाया इतर कोणत्याही नागरिकांप्रमाणेच अरविंद केजरीवाल यांनाही निष्पक्ष आणि निःपक्षपाती खटल्याचा अधिकार आहे, असे केंद्र सरकारला सुनावले होते. त्यावेळी जर्मनीला बोल लावणाया मोदी सरकारने अमेरिकेच्या या वक्तव्यावर मात्र अद्याप गुळणी धरली आहे.

अबकारी कर घोटाळ्यात ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाया केजरीवाल यांच्या अर्जावर दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे. दिल्लीतील मोहल्ला दवाखाने आणि हॉस्पिटलमध्ये मोफत औषधांचा तुटवडा पडणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश केजरीवाल यांनी आज ईडीच्या कोठडीतून दिले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.