नवाब मलिक यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
मुंबई: अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती खालावली आहे. कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार आणि उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याप्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी सुरू होती. सध्या ते वैद्यकीय जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याची माहिती त्यांची मुलगी सना मलिक हिने शनिवारी दिली. त्यानंतर त्यांना कुर्ला येथील रुग्णालयात आप्तकालीन कक्षात दाखल करण्यात आले आहे.
डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. त्यांना श्वसनासंदर्भात त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुर्ला येथील क्रिटिकेअर सेंटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीने त्यांना अटक केली होती.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित प्रकरणात नवाब मलिक यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार करणे तसेच त्याच्या बहिणीशी जमीन व्यवहार करण्यासंदर्भात ईडीकडून त्यांची चौकशी सुरु होती.अटक केल्यानंतर अनेक दिवस ते तुरुंगात होते. काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणामुळे त्यांना जामीन मिळाला होता. प्रकृती अस्वस्थामुळे सध्या ते राजकीय कार्यक्रमांपासून दूर आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.