पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना पितृशोक मंगळ वेढ्याचे पहिले डॉक्टर गुंडोपंत डोके यांचे निधन
सांगली : मंगळवेढा तालुक्यातील पहिली एमबीबीएस पदवी मिळवणारे डॉक्टर गुंडोपंत ज्ञानेश्वर डोके (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांचे ते वडील होते. माचणूर (ता. मंगळवेढा) येथे डॉ. डोके यांच्या पाथिर्वावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तालुक्यातील पहिल्या डॉक्टरांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. डोके मंगळवेढा तालुक्यातील पहिले एमबीबीएस डॉक्टर होते. त्यांनी सरकारी नोकरी न स्विकारता गावात राहूनच गोर-गरिबांची सेवा करायची या उद्देशाने त्यांनी वयाच्या ७५ वर्षापर्यंत रूग्णांची सेवा केली. गरिबांचे डॉक्टर अशी त्यांची पंचक्रोशीत ओळख होती. डॉ. डोके यांच्या निधनाने माचणूरसह परिसरावर शोककळा पसरली आहे.डॉ. डोके यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.