महाविकास आघाडीतील पक्षांमधील लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा अद्याप मिटलेला नाहीये. राज्यातील वादग्रस्त जागांबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे निरोप पाठवला आहे. महाविकास आघाडी तोडायची नाहीये मात्र, आपल्या हक्काच्या जागा सुद्धा सोडायच्या नाहीयेत अशी भूमिका राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे. मात्र, वादग्रस्त जागांपैकी एक असलेल्या सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचा उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस नेते चांगलेच नाराज झाले आहेत. त्याच दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
सांगली, भिवंडी लोकसभा मतदरासंघ हे आपल्याकडेच असायला हवा असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला. सांगली, भिवंडी आणि मुंबईतील तीन जागांवरील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच उद्धव ठाकरेंनी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा सुद्धा केली. मात्र, जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नसताना उद्धव ठाकरेंनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्याने काँग्रेस नेते नाराज झाले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली असली तरी आपण मतदारसंघ सोडायचा नाही अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे. इतकेच नाही तर सांगली लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार देण्यात यावा. सांगली, भिवंडी आणि मुंबईतील तीन जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्यात यावी अशी भूमिका काँग्रेसच्या काही नेत्यांनी घेतली आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची एक ऑनलाईन बैठक शुक्रवारी (29 मार्च 2024) पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेत्यांनी या संदर्भात दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना कळवले आहे. आता या निर्णयावर पक्षश्रेष्टी काय भूमिका घेते तसेच काय निर्णय घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महाविकास आघाडीतील जागावाटप नाही
महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये. तसेच कोण किती जागांवर लढणार हे सुद्धा स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र, असे असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्षाने आपल्या काही उमेदवारांच्या नावांची सुद्धा घोषणा केली आहे.
हे आहेत शिवसेनेचे 17 उमेदवार
बुलढाणा - प्रा. नरेंद्र खेडेकरयवतमाळ - वाशिम - संजय देशमुखमावळ - संजोग वाघेरे पाटीलसांगली - चंद्रहार पाटीलहिंगोली - नागेश पाटील आष्टीकरछत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरेधाराशिव - ओमराजे निंबाळकरशिर्डी - भाऊसाहेब वाकचौरेनाशिक - राजाभाऊ वाजेरायगड - अनंत गितेरत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक राऊतठाणे - राजन विचारेमुंबई उत्तर पूर्व - संजय दिना पाटीलमुंबई दक्षिण - अरविंद सावंतमुंबई उत्तर पश्चिम - अमोल कीर्तिकरदक्षिण मध्य - अनिल देसाईपरभणी - संजय जाधव
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.