Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चंदन तस्कर वीरप्पणची मुलगी विद्याराणी लोकसभेच्या रिंगणात, 'या ' पक्षाकडून निवडणूक लढविनार

चंदन तस्कर वीरप्पणची मुलगी विद्याराणी लोकसभेच्या रिंगणात, 'या ' पक्षाकडून निवडणूक लढविनार 

कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याची मुलगी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. वीरप्पनची मुलगी विद्या राणी हिने स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तामिळनाडू येथील कृष्णागिरी लोकसभा मतदारसंघातून विद्या राणी निवडणूक लढणार आहे. विद्या राणीने म्हटले, आपल्या वडिलांप्रमाणे मी सुद्धा जनसेवा करु इच्छिते. फक्त वडिलांची पद्धत ही योग्य नव्हती.

कोणत्या पक्षाकडून उमेदवारी?

विद्या राणीने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच तिने भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर विद्या राणीने अभिनेता आणि दिग्दर्शक सीमान यांच्या नाम तमिलर काची (NTK) पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता एनटीकेने विद्या राणी हिला कृष्णागिरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. विद्या राणी ही कृष्णागिरी येथे एक शाळा चालवते. यासोबतच ती एक सामाजिक कार्यकर्ता सुद्धा आहे. त्यामुळेच ती लोकांशी जोडली गेलेली आहे.

वडिलांसोबत एकदाच भेट

विद्या राणी ही आपले वडील वीरप्पन यांना आयुष्यात एकदाच भेटली होती. विद्या राणी तिसरीत शिकत होती तेव्हा त्यांची भेट झाली होती. तामिळनाडू-कर्नाटक सीमेवर गोपीनाथम येथे त्याच्या आजोबांच्या घरी ही भेट झाली होती. विद्या राणी नेहमी म्हणते की, तिच्या वडिलांनी जो मार्ग निवडला होता तो चुकीचा होता. मात्र, असे असले तरी त्यांनी नेहमी गरिबांचा विचार केला. माझ्या वडिलांना जनतेची सेवा करायची होती पण त्यांनी त्यासाठी निवडलेली पद्धत चुकीची होती. आता मी जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आली आहे.

विद्या राणीचे आयुष्य

विद्या राणीची आई मुथुलक्ष्मी या आमदार टी वेलमुरुगन संचालित राजकीय संघटनेशी संबंधित आहेत. विद्या राणीला आरएसएस आणि वनवासी कल्याण आश्रमाने दत्तक घेतले होते. तिने आश्रमात राहून तेथेच शिक्षण घेतले होते. विद्या राणी या व्यवसायाने वकील आहेत तसेच त्या एक अॅक्टिव्हिस्ट सुद्धा आहेत आणि आदिवासी तसेच दलितांसाठी काम करतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.