मीरारोड : अरुणाचल प्रदेश राज्याच्या आरटीओ कडे बनावट कागदपत्रां द्वारे वाहनांची नोंदणी रून तिकडून नाहरकत घेऊन वाहनांची नोंदणी वसई प्रादेशिक परिवहन विभागात करून शासनाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला मदत करण्यासाठी १० लाखांची लाच मागणाऱ्या मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट १ चा सहायक पोलिस निरीक्षक कैलास जयवंत टौकले (४१) विरुद्ध काशीमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१३ डिसेंम्बर २०२३ रोजी विरार पोलीस ठाण्यात प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक उज्वल भावसार यांच्या फिर्यादीवरून प्रवीण राऊत विरोधात गुन्हा दाखल झाला होता. अरुणाचल प्रदेश राज्यातील आरटीओ कडे बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहनांची नोंदणी करून त्या कागदपत्रांच्या आधारे वसई प्रादेशिक परिवहन कार्यालयात ३४ वाहने नोंदणी करून शासनाची फसवणूक केल्या बद्दल हा गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ काशीमौरा युनिट करत होते. तपासात रामकैलास लालबहादूर यादव रा. भाईदर् पूर्व ह्याला अटक करण्यात आली होती. सदर गुन्ह्यात आरोपी हा न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक कैलास टोकले याने आरोपी यादव याला जामीन मंजूर व्हावा तसेच गुन्ह्यातील कागदपत्रे आरोपीच्या सोयीने बनवण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी त्याच्या भावा कडे मागितली होती.काशीमीरा युनिट मध्येच १० लाखांची मागणी केली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्या पथकाने पडताळणी करून खात्री केली होती. त्यानुसार बुधवार २७ मार्च रोजी आरोपीच्या भावाच्या फिर्यादीवरून काशीमीरा पोलिस ठाण्यात कैलास टोकले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.