सांगली - भिवंडी आमच्या परंपरागत जागा; कोणीही दावा करू नये !
मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी देशभरात आचारसंहिता लागू झाली असली तरीही अद्याप राज्यात महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरे गट आणि शरद पवार गटासाठी एक सूचक विधान केलं आहे.
नाना पटोले म्हणाले की, सांगली आणि भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत. त्या जागांवर कोणीही दावा करू शकत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सांगलीमध्ये जाहीर केलेली उमेदवारी योग्य नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
नाना पटोले यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये एकतर्फी उमेदवारी जाहीर करणे हे अडचणीचे झाले आहे. महाविकास आघाडीमध्ये हे व्हायला नको. एकीकडे चर्चा चालू असताना दुसरीकडे त्या जागेवर नाव जाहीर करायला नको होते. उद्धव ठाकरे अशा पद्धतीने नावं जाहीर करणं योग्य नाही, अशा शब्दांत नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.