पोशाख आणि ड्रेस कोडबाबत शिक्षकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
जगाच्या अनेक कक्षा रुदावत असताना शिक्षकांना विविध बंधने घालणे योग्य नाही. योग्य समाजमान्य पेहराव करुनच सर्व शिक्षक शाळेत जातात, असे असताना ड्रेस कोडच्या नावाखाली शिक्षकांना पोशाखाबाबत बंधने घालणे हे काळाला धरुन नाही. यापूर्वी शासनाने शिक्षकाचा फोटो वर्गात लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यालाही सर्व शिक्षक संघटनानी तीव्र विरोध केला होता आणि तो निर्णय हाणून पाडला.
हा निर्णयही शिक्षक हाणून पाडतील. येत्या गुरुवारी २८ तारखेला शहर आणि जिल्ह्यातील शिक्षकांनी शाळेत जिन्स घालून यावे असे आवाहन सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.