Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मनमाडमध्ये संभाजी भिडेंची कार अडवली, काळे झेंडेही दाखवले

मनमाडमध्ये संभाजी भिडेंची कार अडवली, काळे झेंडेही दाखवले

नाशिकमधल्या मनमाड या ठिकाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांचा गाडीला काळे झेंडे दाखविण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेडकरी विचारांच्या अनुयायांनी या घोषणा दिल्या आहे. येवला या ठिकाणाहून मालेगावला जात असतांना त्यांची गाडी अडविण्यात आली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत काळे झेंडे दाखवणाऱ्यांना दूर केलं.

नेमकं काय घडलं

येवला या ठिकाणाहून मालेगावच्या दिशेने संभाजी भिडे जात होते. त्यावेळी त्यांची कार अडवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर काही जणांनी काळे झेंडे दाखवले आणि संभाजी भिडे मुर्दाबाद अशा घोषणाही दिल्या.

काही तरुण हे थेट संभाजी भिडे ज्या कारमध्ये बसले होते त्या कारच्या समोर आले. या प्रकरणात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि घोषणाबाजी करणाऱ्यांना आणि कारसमोर आलेल्या तरुणांना बाजूला सारले. त्यानंतर संभाजी भिडे यांची कार धुळ्याच्या दिशेने पुढे गेली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.