भर कार्यक्रमातून बाहेर जाताना आर्ची चाहत्यांवर भडकली
जळगावांत शासनाकडून महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला सैराट फेम रिंकु राजगुरु हीने हजेरी लावली. तिला पाहण्यासाठी जळगावात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात चाहत्यांची बरीच गर्दी पाहायला मिळाली. पण या गर्दीतून बाहेर जाताना मात्र आर्ची चिडल्यांच पाहायला मिळालं. गर्दीतून बाहेर पडताना एका चाहत्याचा धक्का रिंकुला लागला. त्यामुळे रिंकु चिडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं.
तुमची मुलगी या जागी असती तर तुम्हाला चाललं असतं का? असा सवाल रिंकुने चाहत्यांना केला. चांगला रंगलेला कार्यक्रम संपल्यानंतर रिंकु बाहेर पडताना हा सगळा प्रकार घडला. त्यामुळे आयोजकांची देखील डोकेदुखी वाढली असल्याचं म्हटलं जात आहे. गर्दीतून बाहेर पडताना रिंकुला चाहत्याचा धक्का लागल्यामुळे ती चिडली. त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर काहीसं नाराजीनाट्य पाहायला मिळालं.
रिंकुच्या कार्यक्रमांना चाहत्यांची गर्दी
जळगावमध्ये या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन शासनाकडून करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रिंकुने हजेरी लावली. सैराट या चित्रपटातून आर्ची म्हणून रिंकु चाहत्यांच्या पसंतीस उतरली. तेव्हापासून त्या चित्रपटांतील तिच्या डायलॉगना आजही प्रेक्षक पसंती दर्शवतात. या कार्यक्रमावेळीही रिंकुने सैराटमधील तिचे फेमस डायलॉग म्हटले. त्यावेळी चाहत्यांनी तिला दाद दिली.
परश्या - आर्चीच्या अफेअरच्या चर्चा
या चित्रपटातून आर्ची आणि परश्याची जोडी महाराष्ट्राच्या भेटीला आली. या चित्रपटातील आकाशची सहअभिनेत्री रिंकु राजगुरुची आजही तितकीच चांगली मैत्री आहे. पण मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे लाडके आर्ची आणि परश्या हे फार चर्चेत आले होते. त्यांच्या अफेअरच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होत्या. अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचे ग्रँड वेडिंग रिसेप्शनला आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांनी देखील हजेरी लावली. रिंकूचा झिम्मा-2 हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.