Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इलेक्टोरल बाँड्स प्रकरणावर निवडणूक आयोगाचे प्रमुख म्हणाले, सर्व उघड करणार?

इलेक्टोरल बाँड्स प्रकरणावर  निवडणूक आयोगाचे प्रमुख  म्हणाले, सर्व उघड करणार?

इलेक्टोरल बाँड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. SBI चेअरमन यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून सांगितले की 1 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान 22217 इलेक्टोरल बाँड्स खरेदी करण्यात आले आहेत. त्यापैकी 22030 कॅश करण्यात आले आहेत. एसबीआयच्या अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, आदेशानुसार इलेक्टोरल बाँड देणग्यांबाबत माहिती देण्यात आली आहे.

यापूर्वी एसबीआयने निवडणूक आयोगाला देखील डेटा दिला होता. दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग इलेक्टोरल बाँडवरील सर्व तपशील वेळेत जाहीर करेल. स्टेट बँक ऑफ इंडियाने मंगळवारी निवडणूक आयोगाकडे इलेक्टोरल बाँड्सचे सर्व तपशील सादर केला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला डेटा देण्यास सांगितले होते, त्यांनी (एसबीआय) काल (१२ मार्च) वेळेवर डेटा प्रदान केला आहे. ते म्हणाले की, निवडणूक आयोग नेहमीच पारदर्शकतेच्या बाजूने राहिला आहे. मी जाऊन डेटा पाहीन आणि वेळेवर डेटा प्रकाशित करेन.

लोकसभा निवडणुकीसाठी आयोग पूर्णपणे सज्ज -

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्याबाबत सीईसी राजीव कुमार म्हणाले की, जम्मू-काश्मीर आणि देशात निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी आणि लोकांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. निवडणूक घेण्यास आमची पूर्ण तयारी आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.