Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपानंतर मोदींकडून उमेदवारांना ताकीद

लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपानंतर मोदींकडून उमेदवारांना ताकीद

आगामी लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर देशातील राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असतानाच भाजपनं सर्वतोपरी प्रयत्न करत यंदाच्या निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठीची तयारी सुरु केली आहे. आतापर्यंत भाजपनं निवडणुकीसाठी 398 खासदारांची यादी जाहीर केली असून, यंदा सर्वात मोठा उलटफेर घडवून आणला आहे. पक्षाकडून यावेळी 94 विद्यमान खासदारांना नव्या पर्वासाठी संधी देण्यात आली नसून, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

(निवृत्त) जनरल वी. के. सिंह, अश्विनी कुमार चौबे यांचंही नाव उमेदवार यादीतून वगळण्यात आलेलं आहे. सध्या खुद्द पंतप्रधान  नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, अमित शाह  पक्षाच्या वतीनं जाहीर करण्यात येणाऱ्या अखेरच्या यादीत लक्ष घालत असतानाच पक्षातील खासदारांना आणि इतर कार्यकर्त्यांना सक्तीची ताकीद देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींकडून मिळाली ताकीद आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही काळात पक्षातील खासदारांची दोनदा भेट घेतली. दोन्ही भेटींमध्ये त्यांनी देशातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये केंद्र सरकारच्या योजनांसंदर्भात जनजागृती करण्याची जबाबदारी सोपवली. इतकंच नव्हे, तर कोणत्याही वादग्रस्त वक्तव्यासह कोणत्याही घटनेपासूनही दुरावा पत्करण्याचं आवाहन त्यांनी खासदारांना केलं. पक्षाला अडचणीत आणणारं कोणतंही वक्तव्य करू नका अशी सक्त ताकीदच त्यांनी खासदारांना दिली.

पंतप्रधानांच्या या सूचनांनंतरही भाजपच्या काही खासदारांची नावं वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर आता स्वतः पंतप्रधान या नेतेमंडळींवर लक्ष ठेवत असून, त्यांच्यासंदर्भात पक्षातील इतर नेतेमंडळींचं मतही विचारात घेतल्याचं म्हटलं जात आहे.

इतकंच नव्हे, तर त्यांच्या शब्दाबाहेर असणाऱ्या खासदारांना पुढील कार्यकाळासाठीचं तिकीटही नाकारण्यात आलं आहे. पक्षाच्या दृष्टीनं पंतप्रधान घेत असलेला हा निर्णय पाहता कोणतंही वादग्रस्त वक्तव्य न करता पक्षाच्या आणि नागरिकांच्या विकासावर भर द्या हा स्पष्ट संदेश खासदारांना मिळत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.