चुकून वातानुकूलित डब्यात चढलेल्या महिलेला तिकीट तपासनीसाने गाडीबाहेर ढकलले !
झेलम एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्यामध्ये बसलेल्या एका महिलेला तिकीट तपासणी करणार्याने चालत्या गाडीतून बाहेर ढकलून दिले. ही महिला गाडी आणि फलाट यांच्यामध्ये अडकल्याने घायाळ झाली. या वेळी प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबवली. त्यानंतर फलाटावरील सुरक्षारक्षकांनी या महिलेला बाहेर काढले. तिला रुग्णालयात भरती करण्यात आले असून तिकीट तपासणी करणार्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही महिला झाशी येथे जात होती आणि तिने सामान्य डब्याचे तिकीट काढले होते. ती चुकून वातानुकूलित डब्यात चढली. त्यावर तिकीट तपासणी करणार्याने तिला उतरण्यास सांगितले. यावर महिलेने दंड भरण्यास सिद्ध असल्याचे सांगितले, तरीही तिला तपासणी करणार्याने बाहेर ढकलून दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.