सांगली लोकसभा मतदारसंघ कोण लढविणार? यावरून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये मतभेद तीव्र झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत.
दुसरीकडे शिवसेनेचे पदाधिकारी ही काँग्रेसच्या भूमिकेने अस्वस्थ आहेत. त्यामुळे दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कार्टून वॉर रंगल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सांगलीत आघाडीत निर्माण झालेली बिघाडी चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांयाचे चित्र आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. अद्याप जिल्ह्यात काँग्रेसचा गट मोठ्या प्रमाणात कार्यरत असताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने विश्वासात न घेता सांगलीतुन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील हे लोकसभेची तयार केली होती मात्र परस्पर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस नाराज असून हा वाद आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासभेचे एक व्यंगचित्र काँग्रेस कार्यकत्यांनी समाज माध्यमावर टाकले. त्यामध्ये उध्दव ठाकरे हे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करत असून चंद्रहार पाटील यांना साथ देण्याचे आवाहन करण्याचे दाखविण्यात आले होते. तर समोरच्या गर्दीतून सांगलीत मशाल नाय, विशालच असे लोक बोलत असत्याचे दाखविण्यात आले होते .काँग्रेस कार्यकर्त्यांनी फेसबुक, व्हॉटस अपवर माध्यमावर सांगलीत शिवसेनेची ताकद काय? एक ग्रामपंचायत तरी त्यांनी जिंकली आहे काय? असे प्रश्न विचारणारा मजकूरही फिरत असल्याचे दिसून आले होते. याला ठिक-ठिकाणी काही शिवसेनेचे कार्यकर्ते उत्तर देताना दिसून आले. मात्र सायंकाळी अचानक दोन व्यंगचित्रे शिवसैनिकांनी समाज प्रसारित केलेले व्यंगचित्र, त्याच्या उत्तरात शिवसेनेकडून माध्यमांवर फिरवायला सुरुवात केली.पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही ही चित्रे समाज माध्यमांवर टाकली त्यामध्ये विशाल पाटील आणि प्रतिक पाटील यांचा किती मतांनी पराभव झाला आहे याचा उल्लेख करण्यात आला होता. शिवाय व्यंगचित्र ही आमच्या पक्षाची खासियत आहे. कुंचल्यातून पक्षाचा जन्म झाला आहे, त्यामुळे आमच्या हत्याराचा वापर आमच्यावर करताना दहावेळा विचार करायचा असा सल्लाही देण्यात आलेला दिसून आला. दोन मित्रपक्षांनी एकमेकांच्याविरूध्द केलेली टिप्पणी भाजप कार्यकर्त्यांना मात्र आनंदाच्या उकळ्या फोडणारी ठरली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.