तंबाखू न दिल्याने रागात पोलिसाने झाडल्या गोळ्या; शिक्षकाचा मृत्यू
लखनऊ : गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. लोक क्षुल्लक कारणांवरुनही हत्या आणि मारामारी करत असल्याच्या अनेक घटना समोर येतात. अशीच एक हादरवणारी घटना आता समोर आली आहे. यात एका हवालदाराने गोळी मारून शिक्षकाची हत्या केली. यूपीच्या मुझफ्फरनगरमध्ये एका हवालदाराने शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली. हवालदाराने सरकारी कार्बाइनने शिक्षकावर गोळी झाडली. घटनेच्या वेळी हवालदाराने आणि शिक्षक एकाच वाहनातून प्रवास करत होते.
यूपी बोर्ड हायस्कूल परीक्षेची प्रती घेऊन ते वाराणसीहून मुझफ्फरनगरला आले होते. त्यानंतर वाहनात दोघांमध्ये वाद झाला, त्यातूनच हवालदाराने हे भयानक पाऊल उचललं. मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेची प्रती घेऊन रात्री उशिरा वाराणसीहून मुझफ्फरनगरला पोहोचलेल्या टीमच्या एका पोलीस सदस्याने क्षुल्लक कारणावरून त्याच्यासोबत बसलेल्या शिक्षकावर गोळ्या झाडल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी शिक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
सध्या पोलिसांनी मृत शिक्षकाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून टीममधील सर्व लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. आरोपी हवालदार दारूच्या नशेत होता आणि रात्री शिक्षकाकडे तंबाखूची मागणी करत होता, असं सांगण्यात येत आहे. आरोपी हवालदाराने तंबाखू न दिल्याने गोळीबार केला. गोळ्यांच्या आवाजामुळे घटनास्थळी घबराट पसरली होती.
14 मार्च रोजी वाराणसीची एक टीम यूपी बोर्ड हायस्कूल परीक्षेच्या प्रती इतर जिल्ह्यांतील महाविद्यालयांमध्ये जमा करण्यासाठी रवाना झाली होती. ज्यामध्ये शिक्षक धर्मेंद्र कुमार, संतोष कुमार आणि पोलीस पथकात उपनिरीक्षक नागेंद्र चौहान, मुख्य हवालदार चंद्र प्रकाश यांच्यासह दोन कर्मचारी जितेंद्र मौर्य आणि कृष्णा प्रताप यांचा समावेश होता. प्रयागराज, शाहजहांपूर, पिलीभीत, मुरादाबाद आणि बिजनौरमध्ये प्रती दिल्यानंतर ही टीम रविवारी रात्री उशिरा मुझफ्फरनगरच्या सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या एसडी इंटर कॉलेजमध्ये पोहोचली. मात्र कॉलेजचं गेट बंद असल्याने ही टीम रात्री गाडीतच विश्रांती घेत होती.
यावेळी टीममधील कॉन्स्टेबल चंद्रप्रकाश याने शिक्षक धर्मेंद्र कुमार यांच्याकडे तंबाखूची मागणी केल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या चंद्रप्रकाशने तंबाखू न दिल्याने शिक्षक धर्मेंद्र यांच्यावर कार्बाइनने गोळीबार केला. ज्यामध्ये शिक्षक धर्मेंद्र अनेक गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाले होते.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक पोलिसांनी जखमी शिक्षकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तिथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी शिक्षकाला मृत घोषित केलं. त्यानंतर पोलिसांनी शिक्षकाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला, तर टीममध्ये समाविष्ट असलेल्या सर्व लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.