मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह बनले उकिरडा, दारूच्या बाटल्याचा खच जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह बनले उकिरडा, दारूच्या बाटल्याचा खच जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी मिरज मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहात सोयी सुविधांचा अक्षरशा बोजवारा वडाला असून हे वसतिगृह म्हणजे अक्षरशः उकिरडा बनले आहे .या ठिकाणी विना दरवाजाची शौचालय फुटलेल्या खिडक्या तुंबलेले ड्रेनेज,छताला पडलेल्या भेगा यामुळे इथं राहणारे विद्यार्थी कंटाळून गेलेयत. समाजाला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या डॉक्टरांनाच अस्वच्छतेला सामोरे जावे लागतेय. धक्कादायक म्हणजे एका खोलीत तर मोठ्या प्रमाणावर दारूच्या मोकळ्या बाटल्या मिळून आल्यायत.ही परिस्थिती पाहता महाविद्यालयाच्या प्रमुखांचं अथवा वैद्यकीय अधिष्ठात्यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
सांगली आणि मिरज शासकीय रुग्णालयांसाठी कोट्यावधींचा निधी सरकारकडून दिला जात असताना या विद्यार्थी वस्तीग्रहाच्या दुरावस्थेसाठीही शासनाने तरतूद करायला हवी.यासाठी लवकरच राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाशी संपर्क करून या वस्तीगृहाला उर्जित अवस्था प्राप्त करून द्यावी यासाठी लोकहित मंचच्या वतीने प्रयत्न केला जाणार आहे .
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनीही याकडे लक्ष देऊन सदर वसतिगृहाला भेट देत परिस्थितीची पाहणी करावी आणि विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने करण्यात येत आहे.
मनोज भिसे - अध्यक्ष
( लोकहित मंच,सांगली)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.