Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खोकेसम्राट बांधकाम अभियंते मलईदार पोष्टिंगसाठी मंत्र्यांच्या दारात?

खोकेसम्राट बांधकाम अभियंते मलईदार पोष्टिंगसाठी मंत्र्यांच्या दारात?

सार्वजनिक बांधकाम खात्यात बढतीसह मलईदार पोस्टींगसाठी अघोषित टेंडर निघाले असून निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात अनेक रथी महारथींनी फिल्डिंग लावली आहे. सार्वजनीक बांधकाम खात्याचे मुख्य सचिवपद पटकावण्यासाठी कुण्या गिरिष जोशी यांनी फिल्डींग लावली आहे.

तर नाशिक मुख्य अभियंतापदी बढतीसह नियुक्तीसाठी वजनदार अधिक्षक अभियंता पी. पी. सोनवणे यांनी फिल्डींग लावल्याचे समजते. अधिक्षक अभियंता पी. पी. सोनवणे यांच्यावर माजी मंत्री खडसे यांनी सुमारे 200 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. राज्य शासन यंत्रणेत आता सुपरक्लासवन अधिकारी अभियंते यांच्यावर कितीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरी हा आरोपांचा डोंगर असणे हीच गुणवत्ता मानली जात असल्याचे समजते.

"जो जो प्रचंड भ्रष्ट तो तो मंत्र्यांना वाटतोय इष्ट” असा नवा मंत्र प्रशासनात घुमला आहे. यासाठी सामान्य प्रशासन विभाग सचीव देशपांडे यांची बदली करुन त्यांना तेथून हुसकावून हाकलून देण्याचे कारस्थान हाणून पाडण्यात आले. याकामी कोण कोण हस्तक्षेप करणार ते उघड आहे. सार्वजनीक बांधकाम सचीव पदासाठी गिरीष जोशी यांनी फिल्डींग लावल्याचे वृत्त आहे. बढत‌ीसह हे पद पटकावण्याचे त्यांचे डावपेच उघड होताच त्यांचे नांदेडचे रस्ता कामाचे 45 लाखांचे प्रकरण चर्चेत आले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध भोकर न्यायालयात भादवि कलम 420 चा गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात येते. कलम 409, 407, 468, 471, 34 अन्वये देखील गुन्ह्याची नोंद आहे. उच्च न्यायालयातील प्रकरणांना सर्वोच्च न्यायालयात आव्हाने देऊन काही प्रकरणांना स्थगिती मिळवल्याचे समजते. 3 नोव्हेंबर 2017 चे हे प्रकरण आहे. बढ़ती मिळवण्यासाठी "आपल्या विरुद्ध कोणताही आरोप नाही किंवा गुन्हा नोंद नाही, न्यायालयात खटला दाखल नाही" असे खोटे अँफ़ेडेव्हिट अभियंते करुन देत असल्याचे समजते.

जळगावचे अभियंता सोनवणे यांच्यावर आमदार खडसे यांनी सुमारे दोनशे कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हे फक्त आरोप होते. त्याची शासनाने काय चौकशी केली? त्यांना क्लिन चीट दिली काय? ते बाहेर आले नाही. सोनवणेंवर आरोप करणारे खडसे विरुद्ध जळगाव जिल्ह्यातील तिन मंत्री अशा वादाच्या कुस्तीचे निकाल सध्या शुंन्यावर आहे. मंत्री महाजनांच्या मर्जीतील अभियंता म्हणून सोनवणे यांचा नावलौकिक आहे. तीन मंत्र्यांना ते उत्कृष्ट तर एकट्या खडसे यांना ते भ्रष्ट अभियंते वाटतात. राजकीय नेत्यांच्या भांडणात बांधकाम अभियंत्याचा सँडविच होता कामा नये असे लोकांना वाटते. परंतु कितीही तक्रारी कोणत्याही अभियंत्याबद्दल केल्या तरी बांधकाम मंत्री रविद्र चव्हाण यांचा सर्वांना मुक्त आशिर्वाद असल्याने "माल लगाव – माल कमाओ” असे एकंदरीत वातावरण असल्याचे म्हटले जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.