लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, व्हिडिओ वायरल करणायची धमकी, जबरदस्तीने दुसऱ्यासोबत संबंध ठेव न्यास भाग पडले
पुणे :लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, व्हिडिओ वायरल करणायची धमकी, जबरदस्तीने दुसऱ्यासोबत संबंध ठेव न्यास भाग पडले लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन संबंध ठेवतानाचे मोबाईलमध्ये केलेले चित्रीकरण व न्युड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन इतरांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले.
हा प्रकार सन 2019 ते 2023 या कालावधीत डेक्कन येथे आरोपीच्या घरात घडला आहे. याबाबत 31 वर्षीय तरुणीने (मुळ रा. उस्मानाबाद) शनिवारी (दि.30) डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सतिश डिकोस्टा/ऑगस्टीन पगारे (वय-42 रा. म्हात्रे ब्रीज, डेक्कन) याच्यावर आयपीसी 376, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
महिला सहायक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डेकोरेशनचे काम करतो. फिर्यादी आणि आरोपीची ओळख 2019 मध्ये झाली. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना सतीश डिकोस्टा असे नाव सांगितले. त्यानंतर डिकोस्टाने फिर्यादी यांना घरी बोलावून घेत लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने संबंध ठेवतानाचे चोरुन चित्रीकरण व न्युड फोटो त्याच्या मोबाईल मध्ये फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला.मोबाईल मधील व्हिडीओ व फोटो दाखवून ब्लॅकमेल करत मित्रांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले. तसेच इतर लोकांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास सांगून फिर्यादी यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर माझे राजकीय व्यक्तींसोबत संबंध असून तू वेश्या व्यवसाय करत असल्याचे सिद्ध करेन, अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास एपीआय वर्षा शिंदे करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.