कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. युसूफपूर मोहम्मदाबाद गाजीपूर येथील कब्रस्थानात अन्सारीचा दफनविधी करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी झालेली तुफान गर्दी लक्षात घेता कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच गर्दीवर ड्रोनद्वारेही नजर ठेवण्यात आली होती. अन्सारीच्या कुटुंबियांनाच त्याला मूठमाती देण्याची परवानगी देण्यात आली होती.
अन्सारीच्या मृत्यूबाबत साशंकता व्यक्त होत आहे. त्यामुळे शुक्रवारी मॅजिस्ट्रेट न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहे. अन्सारीला बांदा येथील तुरुंगात स्लो पॉइजन देण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. बांदा येथील राणी दुर्गावती मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, त्याचा अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही. हृदयविकाराच्या झटक्यानेच अन्सारीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
अन्सारीच्या दफनविधीवेळी पोलिसांच्या 24 गाड्या तैनात होत्या. तसेच अन्सारीच्या दफनविधीवेळी मोठा जमाव उपस्थित होता. मोठ्या जमावावर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात आली होती. तसेच कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याच्या कुटुंबियांनी अन्सारीला मूठमाती देत त्याचा दफनविधी करण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.