साताऱ्यातील घटना लग्नासाठी बॉयफ्रेंडसोबत गेली, त्याच्चाच मित्राने केला बलात्कार
साताऱ्यात अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दोघांनी २२ वर्षीय तरुणीवर अत्याच्यार केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली असून तरुणीच्या प्रियकरासह आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
प्रियकर आणि तुझ्या शारीरिक संबंधाचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. ते व्हायरल करेन अशी धमकी देऊन २२ वर्षीय तरुणीवर एकाने अत्याचार केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आकाश जाधव आणि पीडित तरुणीचे प्रेमसंबंध होते. लग्नाचं आमिष दाखवून आकाशने पीडित तरुणीला शहरातील एका लॉजवर नेलं. आकाश आणि पीडित तरुणीने शरीरसंबंध ठेवले. त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा दावा आकाशच्या मित्राने करत तरुणीवर अत्याचार केले.
लॉजवरचा तुमचा दोघांचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. तो व्हायरल करेन अशी धमी संकेत अशोक पवार याने पीडित तरुणीला दिली. त्यानंतर गोडोली इथं मित्राच्या घरी अनेकदा बोलावून तिच्यावर अत्याचार केला. तसंच आकाश जाधव याने लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी संबंध ठेवले.पीडित तरुणीने दोघांनी केलेल्या अत्याचाराला कंटाळून शेवटी पोलिसात धाव घेतली. आकाश जाधव याने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकाश जाधव आणि संकेत अशोक पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.