Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खाजगी यू-ट्युब वृत्तवाहिनी प्रतिनिधीवर गुन्हा दाखल

खाजगी यू-ट्युब वृत्तवाहिनी प्रतिनिधीवर गुन्हा दाखल


खाजगी यू-ट्युब प्रतिनिधीने थेट परीक्षा कक्षात जाऊन चित्रीकरण केल्याने स्थानिक विस्तार अधिकार्‍याने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित प्रतिनिधीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. बारावीचा गणित विषयाचा पेपर येथील एका खाजगी महाविद्यालयात सुरू होता. पेपर संपत असताना एका खाजगी यू-ट्युब वृत्तवाहिनी प्रतिनिधीने थेट परीक्षा कक्षात जाऊन चित्रीकरण केले. त्यावेळी तिथे प्राध्यापक असलेल्या ज्यांच्याकडे परीक्षा विभागाचे लेखनिक म्हणून जबाबदारी होती. त्यांचीही मुलाखत घेतली. हे वृत्तांकन सात मिनिटे चालले.

या चित्रीकरणावरून खळबळ झाली असून परीक्षा कक्षातील चित्रीकरण, वृत्तांकन यावरून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशांचे उल्लंघन झाल्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांच्या आदेशावरून विस्तार अधिकारी राजू मुधोळकर यांनी वृत्तांकन करणारा खाजगी वृत्तवाहिनी प्रतिनिधी गणेश खडसे याची पोलिसात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करून वृत्तांकन चित्रीकरण केले असे असले तरी प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश करू नये म्हणून कर्तव्यावरील पोलिसांनी त्या प्रतिनिधीस प्रतिबंध करणे व केंद्र संचालकापर्यंत घेऊन जाणे हा त्यांच्या कर्तव्याचाच भाग आहे. पण असे झालेले नाही.

परीक्षा केंद्राच्या सुनियोजित संचालनासाठी आणि कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये म्हणून महसूल व शिक्षण विभागाच्या प्रतिनिधींचे बैठे पथकही यावेळी केंद्रावर उपस्थित होते. त्यांनीही वृत्तांकनाच्या गैरप्रकारास प्रतिबंध करणे गरजेचे होते. पण तसेही झालेले नाही. कर्तव्यात हयगय म्हणून पर्यवेक्षक शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पण इतरांच्या कर्तव्यप्रतारणे बाबत डोळेझाक म्हणजे समान न्यायाच्या तत्त्वाला दिलेली तिलांजलीच असल्याची प्रतिक्रिया येथील शिक्षणक्षेत्रात उमटली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात उपाहारगृहसुद्धा निर्वेधपणे सुरू होते, ही बाबही शिक्षण प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या गेली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.