सांगलीच्या प्रवीण शिंदेने लपवलेली साडेतीन कोटींची रोकड जप्तइरळीतील एमडी ड्रग्ज कारखाना प्रकरण, ठाण्यात मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई
मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने सांगली येथील एमडी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उद्धवस्त केला. याप्रकरणी सांगलीतील सहाजणांसह दहाजणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला सांगलीतील संशयित प्रवीण शिंदे याच्याकडील चौकशी अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. ड्रग्ज निमिर्ती आणि विक्रीतून त्याने कोट्यवधीची माया जमा केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने ठाण्यातील मित्राकडे लपवलेली साडेतीन कोटींची रोकड मुंबईच्या क्राईम ब्रांचचे पोलिस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या नेतृत्वाखाली केली.
कुर्ला येथे गुन्हे शाखेच्या कक्ष ७ च्या पथकाने वरिष्ठ निरीक्षक महेश तावडे यांच्या नेतृत्वाखाली परवीन बानो शेख (३३) या महिलेला ६४१ ग्रॅम एमडीसह अटक केली. १६ फेब्रुवारीला करण्यात आलेल्या कारवाईत १२ लाख २० हजार व २५ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. निरीक्षक आत्माजी सावंत यांनी तिची चौकशी केली असता मीरारोड येथील व्यक्तीकडून हे एमडी घेतल्याचे तिने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मीरारोड येथील एमडी विक्रेता साजीद शेख उर्फ डेबस (२५) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सहा कोटी किंमतीचा तीन किलो एमडी व तीन लाख ६८ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल मिळून आला. त्याच्या चौकशीत तो सुरत येथील दोघांना एमडी विकत असल्याचे समोर आले.पथकाने सुरतेला जाऊन इजाजअली अन्सारी (२४) आणि आदिल बोहरा (२२) या दोघांना अटक केली. चौकशीत ते सांगलीतून हा एमडी घेत असल्याचे सांगितले. त्यानुसार उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सांगलीतले इरळे गाव गाठून द्राक्षाच्या शेताच्या आड लपून गुपचूप सुरू असलेला एमडीचा कारखाना उद्धवस्त केला. त्याठिकाणी १२२ किलो ५०० ग्रॅम वजनाचा एमडी, एमडी बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करून सांगलीतून पोलिसांनी प्रविण शिंदे (३४), वासुदेव जाधव (३४), प्रसाद मोहिते (२४), विकास मलमे (२५), अविनाश माळी (२८) आणि लक्ष्मण शिंदे (३५) अशा सहा जणांना अटक केली आहे.
यातील प्रविण हा मुख्य आरोपी असून मुळचा सांगलीचा असलेला प्रविण परिवारासह मीररोड येथे स्थायीक झाला होता. दहावीपर्यंत शिकलेल्या प्रविणने चार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात जाऊन एमडी ड्रग्ज बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. प्रविणला प्रत्येक किलो मागे एक लाख रुपये मिळत होते. असे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. कुर्ला, सांगली, गुजरातमधील सूरत या ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी २५२ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. क्राईम ब्रांचचे उपायुक्त नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नीरज उबाळे, आत्माजी सावंत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.