Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मतांसाठी कायपण! भाजपच्या रॅलीतदिले ' अल्ल्हाह हू अकबर 'नारे

मतांसाठी कायपण! भाजपच्या रॅलीतदिले ' अल्ल्हाह हू अकबर 'नारे 


पश्चिम बंगालमधील ४२ लोकसभा जागांसाठी बीजेपी आणि टीएमसीमध्ये लढत होत आहे. दोन्ही पक्षाकडून मतदारांना आकर्षिक करण्यासाठी वेगवेगळ्या रणनिती तयार केल्या जात आहेत. त्यातच दिनहाटामध्ये भाजपच्या रॅलीत अल्लाहु अकबरचे नारे लागले.

कूच बिहारमधून भाजप उमेदवार निसिथ प्रमाणिक यांच्या समर्थनार्थ ही रॅली आयोजित केली होती. भाजप रॅलीत अल्लाहु अकबर स्लोगन समोर आल्यानंतर या रॅलीची चर्चा होत आहे. या रॅलीचे आयोजन भाजप अल्पसंख्याक मोर्चाकडून करण्यात आले होते.

रॅलीमध्ये अल्लाहु अकबरचे नारे दिल्याप्रकरणी भाजपचे कूच बिहारचे अध्यक्ष आणि आमदार सुकुमार रॉय यांनी म्हटले की, रॅली दोन विधानसभा मतदारसंघात सीताई आणि दिनहाटामधील मुस्लिमबहुल क्षेत्रात आयोजित केली होती. रॉय यांनी म्हटले की, लवकरच कूचबिहार शहरात संपूर्ण जिल्ह्यातील मुसलमानांची रॅली आयोजित केली जाईल. भाजप समर्थकांनी सांगितले की, उत्तर बंगाल, विशेष करून कूचबिहार जिल्ह्यातील सुक्तबारी परिसरातील राजबंशी मुसलमानांनी मोठ्या संख्येने सिलीगुडीमधील मोदींच्या रॅलीत सहभाग घेतला होता.

रॉय यांनी म्हटले की, राज्यातील स्थिती बदलत आहे. लोक टीएमसीला सांप्रदायिक म्हणत आहे. त्यांनी मुसलमानांचा केवळ व्होट बँक म्हणून वापर केला आहे. प्रमाणिक यांनी दोन महिन्यापूर्वी एक बैठक बोलावली होती. त्यामध्ये बुरखा परिधान केलेल्या महिलांना भारत माता की जय चे नारे लगावले होते.

मोदींनी नुकतेच म्हटले होते की, संदेशखलीमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारामुळे मुस्लिम महिला टीएमसीच्या विरोधात मतदान करतील. मोदीच्या वक्तव्यानंतर पश्चिम बंगाल बीजेपीने आपल्या २०२१ च्या रणनीतीच्या उलट तयारी केली आहे. आता पक्ष दाखवत आहे की, भाजप भारतीय मुस्लिमांच्या विरोधात नाही. २०२१ मध्ये भाजपने मुस्लिमविरोधी भूमिका घेतली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.