'डॉक्टर' अभिजीत बिचुकले! आर्ट आणि नाट्य क्षेत्रातील कार्यासाठी दिल्लीच्या विद्यापीठाने दिली पदवी
अभिजीत बिचुकेल सिर्फ नामही काफी हैं म्हणत ते कायमच चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या गाण्यांमुळे त्यांना विशेष पसंती मिळाली. त्यातच बिग बॉस मराठीतील त्यांच्या एन्ट्रीमुळे अभिजीत बिचुकले आता घरोघरी पोहचले.
त्यांच्या वक्तव्यांमुळे कायमच हास्यकल्लोळ माजतो. कधी राजकारणातल्या एन्ट्रीमुळे तर कधी पंतप्रधान बनण्याची इच्छा व्यक्त केल्याने अभिजीत बिचुकले हे नाव चर्चेच्या कायमच अग्रस्थानी राहिलं. पण पुन्हा एकदा हे नाव पुढं आलं आहे. कारण अभिजीत बिचुकले आता त्यांच्या नावापुढे डॉक्टर ही पदवी लावणार आहेत.
अभिजीत चुकले आता डॉक्टर अभिजीत बिचुकले झाले आहेत.दिल्लीच्या मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटीतर्फे त्यांना ही पदवी देण्यात आलीये. आजवरचं आर्ट आणि नाट्य क्षेत्रातील कार्य पाहून ही पदवी दिली असल्याचं बिचुकलेंनी सांगितलं.त्यामुळे पुन्हा एकदा अभिजीत बिचुकले हे चर्चेचा विषय ठरले आहेत.
अभिजीत बिचुकले लोकसभेच्या रिंगणात
दरम्यान अभिजीत बिचुकले हे साताऱ्यातून पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा सातारकरांसाठी पुन्हा खास ठरणार असल्याची चित्र आहेत. एबीपी माझासोबत बोलताना अभिजीत बिचुकलेंनी म्हटलं की, लोकांनी मला मतदान करावं मी नक्कीच विकास करेन. मला कुठल्याही पक्षात जाण्याची गरज नाही. माझ्याकडेच अनेक लोक येणार आहे. मी कुठेही गेलो तरी अनेक लोक माझ्याजवळ येऊन फोटो, सेल्फी काढतात .मात्र मतदान का करत नाही हा प्रश्न मलाही पडतोय.
बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले
बिग बॉस -15 मध्ये अभिजीत बिचुकले यांनी सहभाग घेतला होता. अभिजीत बिचुकले हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सलमानला कोणी मोठं झालेलं बघवत नाही, त्याचा 20 वर्षांचा इतिहास बघा, असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला, असं म्हणत बिचुकलेने सलमान खानवर निशाणा साधला होता. अभिजीत बिचुकले हे विविध विषयांवरील त्यांची मतं मांडत असतात. अभिजीत बिचुकले हे मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनमध्ये देखील सहभागी झाल
अभिजीत बिचुकले कायम चर्चेत!
'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. बिचुकलेंनी आजवर अनेक निवडणुका लढवल्या असून त्याला यश आलेलं नाही. बिचुकलेंना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. अनेकदा त्यांनी याबद्दल भाष्य केलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत बिचुकले यांनी अपक्ष अर्ज दाखल करत अनामत रक्कम म्हणून 12 हजार 500 रुपयांची चिल्लर जमा केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.