राखी सावंत अडचणीत, समीर वानखेडेंनी दाखल केला मानहानीचा गुन्हा
मुंबई : अभिनेत्री राखी सावंत नेहमीच तिच्या बेताल वक्तव्यामुळे चर्चेत असते. नेहमीच लाइमलाइटमध्ये राहणारी राखी सावंत अडचणीत आली आहे. बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा मुलाला आर्यन खानला अटक केल्यानंतर माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. ते प्रकरण निवळत असताना समीर वानखेडे यांनी ड्रामा क्विन राखी सावंत विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखेडे आणि राखी सावंत यांच्यातील वाद नेमका काय आहे पाहूयात.
राखी सावंतच्या विरोधात समीर वानखेडे यांनी कोर्टात 11 लाखांच्या मानहानीचा दावा केला आहे. अभिनेत्री, ड्रामा क्वीन राखी सावंत आणि तीचे वकील अली कासिफ खान विरोधात समीर वानखेडे यांनी मानहानीचा दावा केला आहे. समीर यांनी याचिका दाखल केली असून राखी आणि कासिफ यांनी आपली बदनामी करुन प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलाय, असं याचिकेत म्हटलं आहे. मुंबईतील दिंडोशी शहर दिवानी न्यायालयात समीर वानखेडे यांनी राखी सावंत आणि तिचे वकील कासिफ यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे.
ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या गुन्हानंतर राखी सावंतचे वकील कासिफ यांनी म्हटलं आहे, "कायद्याचा अर्थ असा आहे का की जनतेच्या भल्यासाठी खरं बोलल्यास बदनामी होते". सांगायचं झाल्यास राखीचे वकील कासिफ हे आर्यन खान प्रकरणात ड्रग्ज छापेमारी करण्यात आली होती. त्यात अडकलेली मॉडेल मुनमुन धमेचा हिचे वकील देखील हेच होते. ही छापेमारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात झाली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.