शाळेच्या शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
खासगी शाळेतील शिक्षकेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रिया गंगवार असे या शिक्षिकेचे नाव असून ती 28 वर्षांची होती. प्रिया ही बरेलीच्या खासगी शाळेत ही शिक्षिका म्हणून कार्यरत होती. प्रियाने आत्महत्या केली की तिची हत्या करुन मृतदेह लटकवण्यात आला? प्रियावर सासरच्यांकडून, कामावर किंवा इतर ठिकाणावरुन दबाव होता का? प्रिया आपल्या संसारात आनंदी होती का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. यासंदर्भात पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
हुंडा न दिल्याने सासरच्यांनी प्रियाची हत्या केल्याचा आरोप प्रियाच्या माहेरच्यांनी केला आहे. यासंदर्भात पोलिसात तक्रार केली असून सर्वांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याचा अहवाल आल्यानंतर परिस्थितीचा अंदाज बांधता येणार आहे.
एक वर्षाआधीच झाला होता प्रेमविवाह
प्रिया गंगवार आणि शिवांशु रस्तोगी यांनी एक वर्षाआधी प्रेम विवाह केला होता. या लग्नाला दोन्हीकडच्या परिवाराने परवानगी दिली होती. प्रिया लग्नानंतर सासरी राहायला लागली होती. तसेच ती राधा माधव शाळेत शिकवायला होती. तिच्या सासरची मंडळी टेलरिंगचा व्यवसाय करतात. प्रियाच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली.
बदललेली प्रियाची वागणूक
प्रियाची वागणूक थोडी बदलली होती. त्यामुळे शनिवारी सकाळी आपण तिला घेऊन तिच्या माहेरी गेलो होतो, संध्याकाळी आम्ही घरी परतलो, असे सासू अंजली रस्तोगीने सांगितले. पण अचानक प्रियाने हे पाऊल का ऊचलले? याबद्दल माहिती नसल्याचेही सासू अंजलीने सांगितले. दर हुंड्यासाठी सासरच्यांनी प्रियाची हत्या केल्याचा आरोप माहेरच्यांनी केलाय. प्रियाच्या मृतदेहाचे पोस्टमार्टन केले जाईल. तसेच काही संशयास्पद आढळल्यास कोणाची गय केली जाणार नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.