जादाचा सांबर देण्यास नकार दिल्याने बाप लेकाने केली रेस्टॉरंट मालकाची हत्या
इडली सांभर हा दक्षिणेसह संपूर्ण भरातात खाल्ला जाणारा पदार्थ आहे. मोठ्या चविने हा पदार्थ खाल्ला जातो. हॉटेलमध्ये हा पदार्थ खातांना जास्तीच्या सांभरची मागणी केली जाते. काही ठिकाणी सांभर दिला जातो तर काही ठिकाणी जादा पैसे देऊन घ्यावा लागतो. मात्र, चेन्नईमध्ये जास्तीचे सांभर मागीतल्याने एकाच्या जिवावर बेतले आहे. हॉटेलमध्ये इडिली सांभर खाण्यासाठी गेलेल्या पिता पुत्राला जास्तीचे सांभर देण्यास रेस्टॉरंट मालकाने नकार दिल्याने त्याला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे.
शंकर (वय ५०) आणि अरुण कुमार (वय ३०) अशी आरोपी पिता पुत्राची नावे आहेत. तर मृत व्यक्तीचे नाव देखील अरुण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अरुण हा चेन्नईच्या पल्लवरम येथील पम्मल मेन रोडवर असलेल्या अद्यार आनंद भवन रेस्टॉरंट चालवतो. शंकर आणि त्याचा मुलगा हे दोघे अरुण कुमार रेस्टॉरंटमध्ये गेले आणि त्यांनी पार्सल इडिली सांभर ऑर्डर केले. या वेळी त्यांनी अतिरिक्त सांबर मागितले, मात्र रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी ते देण्यास नकार दिला. यामुळे पिता पुत्राला राग आला. त्यांनी याच रागाच्या भरात हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली.
पिता-पुत्र दोघांनी रेस्टॉरंटच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. ही मारामारी थांबवण्यासाठी अरुण मध्ये पडला. मात्र, पिता-पुत्राने त्यालाही गंभीर मारहाण केली. या मारहाणीत अरुण बेशुद्ध पडला. त्याला क्रोमपेट सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. शंकरनगर पोलिसांनी तपास सुरू केला असून पिता-पुत्र दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.सांभर हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे, जो संपूर्ण द्रविड प्रदेशात लोकप्रिय आहे. सांबरात अनेक प्रकारच्या भाज्याही टाकल्या जातात. प्रामुख्याने इडली सांबार, मेदू वडा सांभर आणि डोसा या सोबत सांबर हे प्रामुख्याने खाल्ले जाते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.