Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साड्या वाटल्या की मच्छरदाण्या? नवनीत राणांनी दिलेली साडी पाहून आदिवासी महिला भडकल्या.

साड्या वाटल्या की मच्छरदाण्या? नवनीत राणांनी दिलेली साडी पाहून आदिवासी महिला भडकल्या.

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी केली. यावेळी त्यांनी आदिवासी महिलांना दिलेल्या साडीवरून या महिलांनी संतप्त सवाल उपस्थित केले आहेत. आम्हाला साडी दिली की मच्छरदाणी? असे म्हणत ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

यामध्ये या साड्या आहेत की मच्छरदान्या, असा प्रश्न त्यांना पडला आहे. साड्यांचे वाटप करायचे होते, तर चांगल्या साड्या द्यायचा, असेही या महिलांनी म्हटले आहे. राणा दाम्पत्यांनी वाटलेल्या साड्या निकृष्ट दर्जाच्या असून त्या अजिबात घालण्याच्या लायकीच्या नाही, असा संताप देखील आदिवासी महिलांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे आमच्याकडून वाटप करण्यात आलेल्या या साड्या नसल्याचा दावा राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे करण्यात आला आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओत मात्र मेळघाट परिसरातील काही आदिवासी महिला दिसून येत आहेत. त्यांच्या हातात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे फोटो असलेली बॅग दिसून येत आहे. सोबतच महिलांच्या हातात वेगवेगळ्या रंगाच्या साड्या देखील आहेत. या साड्यांचा वापर घालण्यासाठी करावा, की मच्छरदानी म्हणून तिचा वापर करावा, असा प्रश्न महिला विचारत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.