Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजप नेत्यांनी बदललं एक्स प्रोफाईल; काय आहे 'मोदी का परिवार'?

भाजप नेत्यांनी बदललं एक्स प्रोफाईल; काय आहे 'मोदी का परिवार'? 

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी एक्स प्रोफाईलवर आपला बायो बदलला आहे. जवळपास सर्वच नेत्यांनी आपल्या बायोमध्ये 'मोदी का परिवार' असं लिहिलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आपला एक्सवरील बायो बदलला आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी परिवारवादावरुन भाजपवर टीका केली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या समर्थनात भाजप नेत्यांनी आपला बायो बदलला असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. त्याआधी भाजपकडून हे कॅम्पेन सुरु करण्यात आलं आहे. निवडणुकीतील ही एक रणनीती असू शकते.

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी एका रॅलीमध्ये 'मैं हू मोदी का परिवार' चा नारा दिला होता. त्यानंतर भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आपली 'एक्स'वरील ओळख बदलली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजप एक वेगळा प्रयोग करत असल्याचं दिसत आहे.

शाह आणि नड्डा यांच्यासह केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, डॉक्टर विरेंद्र कुमार, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, नितीन गडकरी, अनुराग ठाकूर, संबित पात्रा, सुधांशु त्रिवेदी, पियुष गोयल, गिरिराज सिंह, ज्योतिरादित्य शिंदे, मनोज तिवारी अशा बड्या नेत्यांनी त्यांच्या एक्सवरील नावासमोर कंसात 'मोदी का परिवार' असं लिहिलंय. सर्व भाजप कार्यकर्ते-नेत्यांकडून याचे अनुकरण केले जाण्याची शक्यता आहे.

कारण काय?

इंडिया आघाडीत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालू यादव यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती. लालू यांनी मोदींच्या कुटुंबावर प्रश्न उपस्थित केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुटुंब नाही त्याला आम्ही काय करु शकतो. पंतप्रधान मोदी हिंदू नाहीत. कारण, त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांनी केशवपण केलं नव्हतं, असं म्हणत त्यांनी विषारी टीका केली होती. पाटन्यातील गांथी मैदानातील एका सभेत त्यांनी ही टिप्पणी केली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.