उमराणीत ग्रामपंचायत सदस्याचा खून, जत तालुक्यात आठवड्यातील तिसरी घटना
जत : जत तालुक्यातील उमराणी येथील ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे याचा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अंतर्गत वादातून खून झाल्याची घटना घडली. आज बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. आठ दिवसांपुर्वी जत येथील एका युवकाचा भरदिवसा गजबजलेल्या चौकात कौटुंबिक वादातून तलवार हल्ला करून खून करण्यात आला होता. तसेच सोमवारी दुपारी जत येथील एका महाविद्यालयीन युवतीचा प्रेमप्रकरणातून गळा दाबून खून केल्याची घटना ताजी असतानाच आज उमराणी ता.जत येथील ग्रामपंचायत सदस्यांचा अंतर्गत वादातून रात्री खून झाला. त्यामुळे जत तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उमराणी ते सिंदूर रस्त्यावर ही घटना घडली आहे. पहिल्यांदा मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन गटात भांडणे होऊन वादावादी झाली. पुन्हा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास जाब विचारण्यासाठी गेला असता धक्काबुक्कीत डांबरी रस्त्यावर पडून डोक्याला मार लागून जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्याच्या मृतदेहावर शव विच्छेदन करुन बुधवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार ही करण्यात आले. जत पोलीस आरोपींचा तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.