भेंडी तर खूपदा खाल्ली असेल आता भेंडीचं पाणी पिऊन बघा, फायदे वाचून व्हाल अवाक्...
भेंडीची भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. भेंडीही एक भाजी म्हणून लोकप्रिय आहे, पण मुळात ही भाजी नसून एक फळ असतं. भेंडीची भाजी खाऊन शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. पण भेंडीच्या पाण्याने किती फायदा होतो हे अनेकांना माहीत नसतं. भेंडीच्या पाण्याचा डायबिटीसमध्येही खूप फायदा मिळतो. तेच आज जाणून घेऊया.
न्यूट्रिशनिस्ट शिखा अग्रवाल शर्मा यांच्यानुसार, डायबिटीस केवळ हेल्दी डाएट आणि अॅक्टिव लाइफस्टाईलच्या माध्यमातून कंट्रोल केला जाऊ शकतो. बरीच फळं आणि भाज्या आहेत ज्या शुगरच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहेत. यांचं सेवन केल्याने डायबिटीसची लक्षण कंट्रोलमध्ये राहतात. यातील एक भाजी म्हणजे भेंडी. भेंडी डायबिटीसच्या रूग्णांसाठी टॉनिक मानली जाते. जर तुम्हाला वाढलेल्या शुगर लेव्हलला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर भेंडीच्या भाजीचं नियमित सेवन करा.
भेंडीतील पोषक तत्व
100 ग्राम भेंडीमध्ये 35 कॅलरी, 1.3 ग्राम प्रोटीन आणि 0.2 ग्राम फॅट असतं. या भाजीमध्ये फायबरही भरपूर असतं. तसेच यात व्हिटॅमिन बी 6 आणि फोलेटसारखे गरजेचे व्हिटॅमिनही असतं. चला जाणून घेऊन भेंटी डायबिटीस कसा कंट्रोल करते.
भेंडीमध्ये भरपूर फायबर
अँटी-ऑक्सिडेंटसोबत यात दोन्ही प्रकारचे फायबर भरपूर असतात. डायबिटीसच्या रूग्णांसाठी भेंडी फार फायदेशीर आहे. फायबर पचन व्हायला वेळ लगतो. हेच कारण आहे की, भेंडी ब्लडमध्ये फार हळूहळू शुगर सोडते. ज्यामुळे ब्लड शुगर वेगाने वाढत नाही.
वजन कमी करा
भेंडीच्या पाण्यात पूर्ण फायबर येत नाही. तरीही याने वजन कमी करण्यास मदत मिळते. Pubmed वर प्रकाशित एका रिपोर्टनुसार, भेंडीच्या पाण्याच्या अर्कात असे कार्ब्स असतात जे शारीरिक वजन, ब्लड शुगर लेव्हल आणि टोटल कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात. याने हायड्रेशन वाढतं. जे वजन कमी करण्यासाठी गरजेचं आहे.
ग्लाइसेमिक इंडेक्सही आहे भेंडीचं काम
यातील फायबर हे तत्व शुगर लेव्हल मॅनेज करतात. या भाजींचं ग्लायसेमिक इंडेक्सचंही काम असतं. याचा अर्थ असा होतो की, असं खाद्यपदार्थ ज्याने शुगर लेव्हल कमी होते आणि हे खाल्ल्याने निघणारी शुगर हळूहळू पचते.
प्रोटीनचा पावरहाऊस भेंडी
भेंडी अशा भाज्यांपैकी एक आहे ज्यात प्रोटीन भरपूर असतं. शुगरच्या रूग्णांना नेहमीच आहारात प्रोटीन सेवनाचा सल्ला दिला जातो. कारण याने व्यक्तीला तृप्त ठेवण्यास मदत मिळते आणि शुगर असलेले फूड खाण्यास रोखते. त्याशिवाय भेंडीमध्ये कॅलरी कमी असतात. ज्यामुळे वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत मिळते. जे डायबिटीसच्या रूग्णांसाठी गरजेचं आहे.
भेंडीचं पाणी कसं बनवाल
मध्यम आकाराच्या पाच भेंडी घ्या आणि त्या स्वच्छ धुवा. भेंडीचे शेंडे कापून दोन भागात कापा.एका भांड्यात तीन कप पाणी टाकून त्यात भेंडी टाका. हे रात्रभर भिजवून ठेवा.सकाळी भेंडी पिळून पाणी वेगळं करा आणि हे पाणी रिकाम्या पोटी प्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.