रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या मुस्लिमांना पोलिसाने मारली लाथ; आरोपी उपनिरीक्षक निलंबित
दिल्लीत एका पोलीस कर्मचाऱ्याने गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पोलीस रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्यांना लाथ मारत असल्याचे दिसत आहे. हे प्रकरण दिल्लीतील इंद्रलोक भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाचे आदेश दिले होते. यानंतर आरोपी उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. व्हिडिओनुसार, रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या लोकांमध्ये एका व्यक्तीला पोलिस मागून लाथ मारतात. ते काही अपशब्दही बोलतात.
यानंतर ते समोरच्या व्यक्तीलाही लाथ मारतात. त्यानंतर पोलीस नमाज अदा करणाऱ्या लोकांना तेथून निघून जाण्यास सांगतात. पोलिस कर्मचाऱ्याच्या गैरवर्तनानंतर अनेक लोक जमा होऊन त्याच्याशी वाद घालत असल्याचेही दिसते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीचे पोलिस उपायुक्त एमके मीणा म्हणाले, प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. योग्य ती कारवाई केली जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.