फसव्या जाहिरातप्रकरणी पतंजलीने मागितली माफी
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी पतंजली आयुर्वेदाने माफी मागितली आहे. पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून बिनशर्त माफी मागितली आहे. प्रतिज्ञापत्रात आचार्य बाळकृष्ण म्हणाले की, “भविष्यात अशा जाहिराती प्रसिद्ध होणार नाही, याची काळजी घेऊ. देशातील नागरिकांना आयुर्वेदिक उत्पादनांचा वापर करून निरोगी जीवन जगण्यासाठी प्रेरित करणे हाच आपला हेतू असल्याचेही’ त्यांनी सांगितले.
अवमान नोटीसला उत्तर न दिल्याने सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना 2 एप्रिल रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. पतंजली आणि आचार्य बाळकृष्ण यांनी न्यायालयाच्या नोटीसला उत्तर न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने तीव्र आक्षेप व्यक्त केला. आणि त्यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई का सुरू करू नये, अशी नोटीस बजावली. आता पतंजली आणि आचार्य बाळकृष्ण यांनी प्रतिज्ञापत्र देऊन माफी मागितली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.