डॅशिंग, दमदार आमदार म्हणून संभाजी आप्पा व मदन भाऊची सांगलीला उणीव जाणवते ती मनसे भरून काढणार : तानाजीराव सावंत
काल माधव नगर येथे प्रभाग क्र.१२ मध्ये मनसेच्या शाखेची स्थापना व पक्ष कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होती. प्रभाग १२ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संजय खोत यांच्या माध्यमातून पक्ष स्थापने पासून काम चालू आहे. येथील नागरिकांची व्यक्तिगत व सार्वजनिक कामे मनसे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने केली जात होती. नागरिकांना त्यांच्या अडीअडचणी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी कार्यालयाची आवश्यकता होती ते संजय खोत यांच्या माध्यमातून पूर्ण झाली.
या शाखेचे व कार्यालयाचे उदघाटन मनसे जिल्हा अध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगले, शहर अध्यक्ष दयानंद मालपे व महिला सेनेच्या जिल्हा अध्यक्ष सरोजा लोहगावे, प्रकाश गायकवाड.अमित पाटील,प्रकाश माळी, विकास गोंधळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तानाजीराव सावंत म्हणाले
सांगळीच्या राजकारणात आम्ही विरोधकाची सक्षम भूमिका निभावत आहे अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे महापुरातील भ्रष्टाचार, कोविड काळातील भ्रष्टाचार हा सर्व पक्षाच्या वतीने केला आहे इथे कोणीही समाजासाठी काम करत नाही फक्त आणी फक्त महापालिका ओरबाडून खाण्यासाठीच ही मंडळी निवडून येतात त्यांना येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवायला हवी.सांगलीचे आमदार हे फक्त ठेकेदार जगाविण्याचं काम करतात त्यांच्याकडे कोणताही व्हिजन नाही केवळ पक्षाच्या पुण्याईवर निवडून आलेत अशे अबोल आमदार सांगलीच्या कामाचे नाहीत श्री संभाजी आप्पा व मदन भाऊ सारखे डॅशिंग व निर्णय घेणारे धडाकेबाज आमदार सांगलीला हवे आहेत ती कमतरता माझ्या माध्यमातून भरून काढणार येणारी विधानसभा मनसे ताकतीने लढाविणार आणी सांगलीला सक्षम धडाकेबाज आमदार देणार(राममंदिराचा उत्सव श्रद्धेने न करता निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस आणि भाजपाने इव्हेंट साजरा केला )
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.