डॉ. आंबेडकरांच्या कमानीवर अमरावतीत जोरदार राडा; दगडफेक अन् लाठीचार्ज
अमरावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान लावण्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे कमान उभारण्यावरून दोन गट आमनेसामने आले आहेत. कमान उभारण्यावरुन निर्माण झालेला वाद चिघळल्यामुळे सोमवारी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आंदोलकांनी तुफान दगडफेक केली.
यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ, पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांची बैठक झाली. गेल्या तीन दिवसांपासून या प्रश्नावरून आंदोलन सुरू आहे. याच मुद्द्यावर आज मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, अशी माहिती मिळत आहे.
तीन दिवस आंदोलन करूनही तोडगा न निघाल्यामुळे पांढरी खानमपूर गावातील एका गटाने जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर आंदोलन आणखी संतप्त झाले व त्यांनी तुफान दगडफेक केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच आंदोलकांवर पाण्याच्या फवाऱ्याने मारा केला.
काय आहे वाद -
अमरावती जिल्ह्यातील पांढरी खानमपूर गावात महापुरुषांच्या नावाची कमान उभारण्यावरुन गावातील दोन गटांमध्ये वाद आहे. गावात कमान उभारण्यावरून दोन गड पडले आहेत. कमावीवरून वाद विकोपाला गेल्यानंतर हा मुद्दा प्रशासनाकडे गेला.दोन दिवसांपूर्वी या मुद्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली होती. तसेच याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. चार दिवसांपूर्वी या गावातील एका गट अमरावतीच्या दिशेने निघाले होते. त्यानंतर हे सर्वजण अमरावतीहून मुंबईत मंत्रालयाकडे जाणार होते. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने त्यांची समजूत काढून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत चर्चा सुरू होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून काहीच निर्णय होत नसल्याने एक गट आक्रमक झाला व त्यांनी दगडफेक सुरू केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.