कारागृहातील कुख्यात गुंड काला जठेडी करणार महिला गुंडाशी विवाह !
सोनीपत (हरियाणा): कारागृहात असणारा कुख्यात गुंड काला जठेडी राजस्थानमधील महिला गुंड अनुराधाशी लग्न करणार आहे. देहलीतील द्वारका न्यायालयाने काला जठेडीला 'पॅरोल' संमत केला आहे. १२ मार्चला देहलीत विवाह सोहळा पार पाडण्यासाठी आणि सोनीपत येथे गृहप्रवेशासाठी न्यायालयाने जठेडीला सकाळी १० ते दुपारी ४ अशा ६ घंट्यांचा पॅरोल दिला आहे.
या काळात देहली पोलिसांकडे सुरक्षेचे दायित्व सोपवण्यात आले आहे. या सर्व कालावधीत पोलिसांवर सुरक्षेचा ताण असणार आहे; कारण जठेडी याच्या विरोधातील टोळी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करू शकते, असा पोलिसांचा तर्क आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.