शरद पवार गटाची पाहिली यादी समोर
सध्या भारतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना उमेदवारी मिळालेली आहे ते आता प्रचाराला देखील लागले आहेत. ज्यांना उमेदवारी मिळण्याची आशा आहे त्यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली आहे.
आतापर्यंत ठाकरे गट, शिंदे गट, अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष तथा काँग्रेसने आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. तथापि शरद पवार गटाची यादी अजूनही जाहीर झालेली नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाची अधिकृत उमेदवारांची यादी केव्हा जाहीर होणार हा मोठा सवाल होता.
आता मात्र लवकरच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करणार असे वृत्त समोर आले आहे. आज सायंकाळपर्यंत पक्षाची अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी देखील सध्या वेगाने व्हायरल होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी चार वाजता शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या अधिकृत उमेदवार यांची यादी जाहीर करणार आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उमेदवारांची यादी मुंबईतील पक्ष कार्यालयात जाहीर करणार अशी बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळू शकते यांची नावे देखील समोर आली असेल. म्हणजेच शरद पवार यांच्या गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे.
दरम्यान आता आपण शरद पवार यांच्या गटाकडून कोणाला उमेदवारी मिळू शकते ? नगर दक्षिणमधून निलेश लंके यांना उमेदवारी मिळणार का, लंके यांचे शरद पवार यांच्या गटाच्या संभाव्य उमेदवारी यादीत नाव आहे का ? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ खालील प्रमाणेबारामती लोकसभा मतदार संघ : विद्यमान खासदार, खासदार रत्न सुप्रिया सुळेशिरूर लोकसभा मतदारसंघ : डॉक्टर अमोल कोल्हेमाढा लोकसभा मतदारसंघ : धैर्यशील मोहिते पाटीलअहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ : निलेश लंकेदिंडोरी लोकसभा मतदारसंघ : भास्कर भगरेवर्धा लोकसभा मतदारसंघ : अमर काळेबीड लोकसभा मतदारसंघ : बजरंग सोनवणेरावेर लोकसभा मतदारसंघ : रवींद्र भैय्या पाटीलभिवंडी लोकसभा मतदारसंघ : बाळ्या मामा म्हात्रेवर दिलेल्या उमेदवारांची यादी ही शरद पवार गटाच्या संभाव्य
उमेदवारांची यादी आहे. अजूनही पक्षाने अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाही. पण, या उमेदवारांना उमेदवारी मिळू शकते असा दावा होत आहे. त्यामुळे आता जेव्हा पक्षाची अधिकृत उमेदवारांची यादी येईल तेव्हा याच उमेदवारांना संधी मिळते का ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.