शालेय अल्पवयीन मुलीशी गैरकृत्य करणाऱ्या नराधम शिक्षकाविरोधात कडक कारवाई करावी--लोकहित मंच--महिला आयोगाकडे तक्रार करणार--अध्यक्ष मनोज भिसे
सांगली :-- सांगली शहरातील एम टी ई एस या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पहिली मधील अल्पवयीन विद्यार्थिनीशी शिक्षकानेच गैरकृत्य केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली असून ,गैरकृत्य करणाऱ्या संदिप प्रकाश पवार या नराधम शिक्षकास विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्याच्यावर कडक कारवाई व्हावी.त्याचबरोबर संस्था चालकांनाही सह आरोपी करण्यात यावे .अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे.
दरम्यान या घटने संदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही लक्ष घालून कारवाई करावी या संदर्भात त्यांनाही मागणी करणारअसल्याची माहिती मनोज भिसे यांनी दिली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश सायमोते पंकज मुळे, आदी उपस्थित होते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.