Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तंबाखू बनवणाऱ्या कंपनीकडे काय काय घबाड सापडलं? आयटीची छापेमारी

तंबाखू बनवणाऱ्या कंपनीकडे काय काय घबाड सापडलं? आयटीची छापेमारी 

गेल्या 15 तासांपासून आयटीची छापेमारी ही विविध राज्यांमध्ये सुरू आहे. आयटीकडून ही छापेमारी एका कंपनीच्या विरोधात सुरू आहे. विशेष म्हणजे मोठे घबाड आयटीच्या हाती लागल्याचे बघायला मिळतंय

अजूनही ही छापेमारी सुरूच आहे. या छापेमारीमुळे मोठी खळबळ बघायला मिळतंय. थेट तंबाखू बनवणाऱ्या कंपनीच्या विरोधात ही छापेमारी सुरू आहे. आयकर विभागाच्या 15 ते 20 टीम या पाच राज्यांमध्ये छापेमारी करत आहेत. हा कंपनीला खरोखरच मोठा धक्का मानला जातोय. कानपूरसह चार राज्यांमध्ये ही छापेमारी सुरू आहे.

बंशीधर टोबॅकोवर आयकर विभागाकडून ही कारवाई केली जातंय. नयागंज येथील बंशीधर एक्सपोर्ट अधिकारी कारवाई करत आहेत. बंशीधर टोबॅको प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक के.के. मिश्रा यांच्या दिल्लीतील घरी देखील आयकर विभागाचे अधिकारी पोहचले. तिथे अधिकाऱ्यांना मोठे घबाड सापडल्याचे बघायला मिळतंय.

बंशीधर टोबॅको प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक के.के. मिश्रा यांच्या घरी 50 कोटींहून अधिक किंमतीच्या कार मिळाल्या आहेत. या कारमध्ये अत्यंत महागड्याही काही गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये 16 कोटी रुपयांच्या रोल्स रॉइस फँटमचा देखील समावेश आहे. ही एक अत्यंत महागडी गाडी आहे. आयकर विभागाकडून कसून चाैकशी ही केली जातंय.

रिपोर्टनुसार, तंबाखू कंपनीतून आतापर्यंत साधारणपणे 4 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. फक्त हेच नाही तर यासोबतच रोल्स रॉयस फँटम, फरारी, मॅक्लारेन, लॅम्बोर्गिनी यासारख्या गाड्या या जप्न करण्यात आल्या आहेत. फक्त कानपूर आणि दिल्लीच नाही तर अनेक राज्यांमध्येही अधिकाऱ्यांकडून ही छापेमारी सुरू आहे.

आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्येही दिल्ली आयकर विभागाकडून छापेमारी ही केली जातंय. रिपोर्टनुसार, कंपनीची उलाढाल ही 20 ते 25 कोटी ही दाखवण्यात आलीये. परंतू प्रत्यक्षात कंपनीची उलाढाल ही तब्बल 100 ते 150 कोटी रुपये आहे. यामुळेच आयकर विभागाकडून ही मोठी छापेमारी सुरू करण्यात आलीये. टॅक्स फाइल प्रकरणातूनच ही छापेमारी सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.