Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजप नेते अशोक चव्हाण मनोज जरांगेंच्या भेटीला ; मध्यरात्री १ वाजेपर्यंत 'या' मुद्दयांवर झाली चर्चा

भाजप नेते अशोक चव्हाण मनोज जरांगेंच्या भेटीला ; मध्यरात्री १ वाजेपर्यंत 'या' मुद्दयांवर झाली चर्चा

देशात काल लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर देशभरातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आल्याचे दिसत आहे. कारण आचारसंहिता लागताच भाजप नेते अशोक चव्हाण यांनी शनिवारी मध्यरात्री अचानक आंतरवालीत जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये तब्बल दीड तास बैठक देखील झाली.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा 

भाजप नेते अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे यांच्यात शनिवारी रात्री आंतरवाली सराटीमध्ये रात्री 11.30 वाजता सुरू झालेली बैठक मध्यरात्री 1.30 वाजता संपली. अशोक चव्हाण हे अचानक आंतरवालीमध्ये दाखल झाले. यावेळी आंदोलनस्थळा शेजारी असलेल्या एका घरात दोघांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली

मनोज जरांगे यांनी सरकारकडून दबाव आणून आंदोलकांवर विनाकारण गुन्हे दाखल होत असल्याचे चव्हाण याना सांगितलं. तसेच सरकारकडून सगेसोयरेबाबत फसवणूक झाल्याचा आरोप देखील जरांगे यांनी केला. दरम्यान जरांगेंच्या मागणीबाबत चर्चा करून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे या भावनेने आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण आल्याचे चव्हाण यांनी सांगितलं.


पुढच्या आंदोलनाची दिशा 24 तारखेला ठरणार 

दरम्यान या भेटीवर बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, सरकारने फसवणूक केल्याचे आपण अशोकराव चव्हाण यांना सांगितले आहे. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचं देखील सांगितले. गुन्हे मागे घ्यायचे ठरलं असतांना उलट अधिक गुन्हे दाखल केले जात आहेत. मागणीप्रमाणे हैदराबादचे गॅझेट्स घेतले नाही, यासह समाजाच्या मागण्या, प्रश्न, शासनाकडून होणारी फसवणूक याबाबत अशोक चव्हाण यांच्यासोमर मांडली आहे. आता ते त्यांच्या परीने प्रयत्न करतील. मात्र, आम्ही 24 मार्च रोजी मराठा समाजाची बैठक बोलाविली आहे. त्यात मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.