सांगलीकर ना जाहीर आव्हान
सांगली शहर पाणी पुरवठा योजना अंतर्गत 56MLD झोन मध्ये 70MLD जलशुध्दीकरण केंद्राचा पाणी पुरवठा सुरू करणे करिताचे माळबंगला केंद्र येथे 56MLD जुने केंद्र झोनच्या 700mm CI रायझिंग मेन पाईपला 70MLD झोन पंप हाऊसची 170 HP पंपाची 711mm MS रायझिंग टाकलेली मेन पाईप जोडणी करणेचे मोठ्या स्वरुपाचे अत्यावश्यक आणि 56 MLD केंद्र फिल्टर हाऊस मधील फिल्टर बेड क्र.3 चे नादुरुस्त व्हॉल्व बदलणेची कामे उद्या मंगळवार दि.12/03/2024 रोजी केंद्राचा पाणी पुरवठा बंद ठेवुन सकाळ 9 वा.पासुन हाती घेणेत येणार आहे.
हे काम जरूर ती व्यवस्था व सामुग्रीसह युध्दपातळीवर करणेत येणार असुन, सदर काम बुधवार दि.13/3/2024 रोजी दुपार पर्यंत ट्रायलसह पुर्ण होणे अपेक्षित आहे.
यामुळे बुधवार दि.13/03/2024 रोजी सकाळ वेळेत या झोनमधील यशवंतनगर,माळबंगला जुनी,आर टी ओ, जयहिंद कॉलनी,वसंत कॉलनी, आणि वाल्मिकी आवास या टाक्या मधुन पाणी पुरवठा होणार नाही. तसेच काम पुर्णत्वानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार दि.14/3/2024रोजी सकाळी अपुरा व कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे. कृपया याची नोंद घेवुन नागरीकांनी मिळणारे पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे ही विनंती.
(सी.एस.कुरणे)
कार्यकारी अभियंता सां.मि.कु.शहर महानगरपालिका
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.