इन्स्टाग्रामवर झाली ओळख, लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार
पुणे : तरुणीशी इन्स्ट्राग्रामवर ओळख झाल्यानंतर पुढे तिच्याशी जवळीक साधत तिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. त्यानंतर तरुणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन लग्नास नकार देऊन मारहाण केल्याचा प्रकार पुण्यात घडला. या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील तरुणावर भाराती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च 2020 ते 10 जानेवारी 2024 या कालावधीत आंबेगाव आणि वाकड येथे घडला आहे.
याबाबत पिंपरी चिंचवड परिसरातील 25 वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि.19) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन आदित्य अर्जुन गिते (वय-25 रा. मु.पो. जामखेड, बैल बाजाराजवळ, ता. जामखेड जि. अहमदनगर) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची अर्जुन गिते याच्याशी इन्स्टाग्रामवर मार्च 2020 मध्ये ओळख झाली होती. ते एकमेकांशी चॅट करू लागले. त्यानंतर आरोपीने तु मला खूप आवडते माझे तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू असे बोलून तरुणीला प्रपोज केले. त्यानंतर त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. तिला विवाहाचे अमिष दाखवत आदित्य गिते याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिने लग्नाचा विषय काढल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरु केली. त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत विवाह करण्यास नकार दिला.
तसेच आरोपी आदित्य याने इंन्स्टाग्रामवर फेक अकाउंट बनवले. त्यावरुन त्याने मुलीला व्हिडिओ कॉल करुन अश्लील चाळे करत होता. याबाबत तरुणीने आरोपीला भेटून व्हिडिओ कॉलवर अश्लील चाळे का करतो अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने चिडून तरुणीला हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.