दहावी-बारावीच्या प्रश्नपत्रिका ठेवलेल्या रूममध्ये मद्यधुंद शिक्षकाचा राडा
दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिका ठेवलेल्या कस्टडी रूममध्ये एका मद्यधुंद शिक्षकांने राडा घातल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. संग्रामपूर पंचायत समितीमध्ये आज 29 फेब्रुवारीला ही घटना घडली. महेंद्र रोठे असे या शिक्षकाचे नाव असून या शिक्षकाची नियुक्ती आज वरवट बकाल येथे सुरू असलेल्या कार्यशाळेत केलेली होती. मात्र, या शिक्षकाने कार्यशाळेत न जाता पंचायत समितीतील कस्टडी रूममध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत वाद घातला.
काय आहे प्रकरण?
संग्रामपूर पंचायत समितीत आज दहावी आणि बारावीचे प्रश्नपत्रिका ठेवलेल्या कस्टडी रूममध्ये एका मध्यधुंद शिक्षकांने गोंधळ घालत शिवीगाळ केली. महेंद्र रोठे असं या शिक्षकाचे नाव असून या शिक्षकाची नियुक्ती वरवट बकाल येथे एका कार्यशाळेत केली होती. मात्र, कार्यशाळेत न जाता त्याने पंचायत समितीतील कस्टडी रूममध्ये जाऊन राडा केला. या कस्टडी रूममध्ये अतिशय सुरक्षित असे दहावी आणि बारावीचे प्रश्नपत्रिका संच ठेवलेले असतात. या रूममध्ये नेमलेल्या व्यक्तीशिवाय कुणालाही जाता येत नाही. राज्यभरात प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार समोर येत असताना कस्टडी रूम मध्ये शिक्षकाने मध्यधुंद अवस्थेत राडा घातल्याने खळबळ उडाली आहे.
परीक्षा केंद्रावर कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट
सध्या राज्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त अभियान चालवलं जात आहे. प्रत्यक्षात मात्र याउलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील रेणुका विद्यालय आणि स्वामी विवेकानंद विद्यालय या दोन परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना पालक सर्रासपणे कॉप्या पुरवतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. गुरुवारी बारावीच्या विद्यार्थ्यांचा रसायन शास्त्राचा पेपर होता. 11 वाजता पेपर सुरू होताच पालक आणि इतर तरुणांची विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवण्यासाठी धडपड सुरू झाली. जवळपासच्या परिसरात असलेली झेरॉक्स सेंटर या कॉपी बहादरांना मदत करण्यात पुढे असल्याचे पहायला मिळत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.