लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकासआघाडीचा जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे, पण भाजप आणि काँग्रेसने त्यांचे काही उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने आतापर्यंत महाराष्ट्रातून 23 उमेदवारांची घोषणा केली आहे, तर काँग्रेसकडून आतापर्यंत 12 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजप आणि काँग्रेसकडून जाहीर झालेल्या या उमेदवारांनंतर महाराष्ट्रातलं 9 जागांवरच्या लढती ठरल्या आहेत.
भाजप-काँग्रेसमध्ये लढतनागपूर- नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरेभंडारा-गोंदिया- सुनिल मेंढे विरुद्ध प्रशांत पडोलेगडचिरोली- अशोक नेते विरुद्ध नामदेव किरसानचंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकरनांदेड- प्रताप चिखलीकर विरुद्ध वसंतराव चव्हाणलातूर- सुधाकर श्रींगरे विरुद्ध शिवाजी काळगेसोलापूर- राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदेनंदुरबार- हिना गावीत विरुद्ध गोवाशा पाडवीपुणे- मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर
महाराष्ट्रातल्या या 9 जागांवरच्या लढती ठरल्या असल्या तरी अजूनही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. महायुती आणि महाविकासआघाडीमध्ये असलेला जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल अशी आशा दोन्ही बाजूंनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात कधी होणार मतदान?
देशभरामध्ये 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, तर 4 जूनला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 टप्प्यांमध्ये मतदान होईल. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे या तारखांना महाराष्ट्रात मतदान होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.