मराठा आरक्षणाकरीता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे. सरकारने सगेसोयऱ्यांची मागणी पुर्ण केली नाही तर आम्ही चार ते पाच कोटी मराठे पुन्हा एकत्र येणार आणि जे काही सुरू आहे. पुन्हा बिघडवणार. असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपुर्वी जरांगे पाटील सरकारला पुन्हा हैराण करून सोडणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांची दडपशाही, गुंडगिरी आणि दहशत ही सत्तेच्या जोरावर चालली असेल तर मला माझ्या मराठा समाजाला एकत्रित यावं लागतं. आम्ही सगेसोयऱ्यांची मागणी करीता पुन्हा एकत्रित येणार आहोत. यासभेसाठी ७०० एकर जागा पाहिली आहे. परंतु अजून ३०० एकर जागा कमी पडत आहे. आता राज्यातील पाच ते सहा कोटी मराठे एकत्रित येणार आहोत. मैदान अजून ठरलेलं नाही. परंतु हे सरकार ऐकत नसेल तर आम्हाला पुन्हा एकत्रित यावं लागणार आहे आणि यांचं सगळं बिघडवणार आहे. असे जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला. यातच जरांगे पाटलांच्या मागण्या काही अंशी सरकारने मान्य केल्या. पंरतु सगेसोयऱ्यांची मागणी अद्यापही मान्य करण्यात आलेली नाही. यानंतर जरांगे पाटलांवर एसआयटी चौकशी लावल्यानंतर जरांगे पाटील शांत झाले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पुर्वी पुन्हा मराठे एकत्र येणार असा इशारा त्यांनी दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.