धक्कादायक! मोलकरणीने 9 महिन्यांच्या मुलाचं केलं अपहरण
हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने अवघ्या 9 महिन्यांच्या मुलाचं अपहरण केलं. मुलाला सुखरूपरित्या शोधून काढणं हे पोलिसांसाठी एक मोठं आव्हान होतं. पोलिसांनी अपहरण करणाऱ्या महिलेची ओळख सहनाज खान अशी केली असून ती एमजीबीएसहून झहीराबादला जाणाऱ्या बसमध्ये चढली होती.
यानंतर तिला पकडण्यासाठी पोलिसांनी तत्काळ जहिराबाद पोलिसांना माहिती देऊन सतर्क केले. बस झहीराबादला पोहोचल्यावर पोलिसांनी सहनाज खानला पकडलं आणि मुलाला सुखरूपरित्या आपल्या ताब्यात घेतलं. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतल्यानंतर कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मदनापेठ आणि जहीराबाद पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याबद्दल कुटुंबीयांनी आभार मानले. मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेची ओळख पटवण्यात सीसीटीव्ही फुटेजने महत्त्वाची भूमिका बजावली. अपहरणाच्या दोनच दिवस आधी आरोपी सहनाज खानने मुलाच्या घरात मोलकरीण म्हणून काम करायला सुरुवात केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.